Kunkumarchan - 21st March 2026 (Vashi, Navi Mumbai)

Back to Programs

'कुंकूमार्चन' शनिवार, २१ मार्च २०२६

आपल्या 'चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई' तर्फे 'कुंकूमार्चन', ह्या कार्यक्रमाचे २०२६ मध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले होते.

चैत्र तृतीयेला (चैत्रगौर) म्हणजेच शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी चार वाजता वाशी, सेक्टर २९ मधील श्री गजानन महाराज मंदिर येथे पहिल्या मजल्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नव्या मुंबईतील अनेक भगिनींनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला ज्यामुळे वेळेआधीच नाव नोंदणी बंद करावी लागली. ७५-८० भगिनींनी यात सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाचे पौरोहित्य श्री. प्रसाद मुळे गुरुजींनी केले.

देवीला सजवण्याचे काम श्री. वाकणकर गुरुजींनी केले. तसेच श्री गजानन महाराज मंदिरातल्या श्री. चंद्रकांत ह्यांनी मदत केली व श्री. अभय गुरुजींनी सुद्धा तयारी करून दिली.

कार्यक्रम स्थळी आल्यानंतर सर्व सुवासिनींना हळदीकुंकू व अत्तर लावून मोगऱ्याचा गजरा व ओटी कोन देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांना बसण्यासाठी व पूजेसाठी टेबल खुर्चीची सोय करण्यात आली होती. विडा-सुपारी, पेढा व कुंकूमार्चन करण्यासाठी कुंकू CFNM कडून देण्यात आले होते.

चित्पावन भगिनींनी पारंपारिक साडी, नथ इत्यादी पेहराव करून अगदी वेळेवर हजर झाल्या होत्या. प्रथम पंचोपचारे देवीचे पूजन झाले करण्यात आले नंतर देवीची १००८ नावे घेऊन कुंकवाचा अभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चाराने वातावरण अतिशय प्रसन्न व भक्तिमय झाले होते.

यथासांग पूजा आणि देवीचा नामजप झाल्यावर देवीची आरती करण्यात आली. प्रसाद म्हणून CFNM कडून आंब्याची डाळ, कैरीचे पन्हे व साबुदाणा खिचडी देण्यात आली होती.

CFNM कोर कमिटी तर्फे सौ. सानिका व श्री. आमोद ताम्हनकर, सौ. केतकी व श्री. कौस्तुभ गोखले, सौ. आरती चितळे, सौ. सायली नेने ह्यांनी व कोर कमिटीच्या इतर सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात विशेष हातभार लावला.

© 2025 Chitpavanfoundation.org - All rights reserved.