चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई च्या प्रमुख उद्दिष्टांपैकी असलेल्या, आपल्या ज्ञातीतील लोकांच्या परस्परांशी ओळखी वाढाव्या तसेच तंदुरुस्ती, आरोग्य, खेळ ह्याविषयी जागरुकता वाढावी म्हणून ह्या वर्षी "Sports Event" आयोजित करण्यात आला होता.
"चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई" तर्फे रविवार, दिनांक 14 जून 2026 रोजी "Sports Event" आयोजित करण्यात आला होता.
त्यासाठी नेरूळ,नवी मुंबई येथील 'आर्मी कॉलनी सोसायटी' येथे बॅडमिंटन, बुद्धिबळ व कॅरम साठी स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते.
आपल्या ज्ञाती मधील वय वर्ष दहा पासून सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी त्या खुल्या होत्या.
एकूण 64 लोकांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग घेतला होता. वय वर्षे 10 पासून ते 75 पर्यंतच्या आजी- आजोबांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. तीन पैकी कुठल्याही एक किंवा दोन खेळांमध्ये सहभागी होता येणार होते.
बॅडमिंटन स्पर्धेत 41, बुद्धिबळ स्पर्धेत 21 तसेच कॅरम मध्ये 23 लोकांनी सहभाग नोंदवला होता. कोणत्याही एका खेळासाठी प्रत्येकी रु 350 व दोन खेळांसाठी रु 500 अशी वर्गणी घेण्यात आली होती.
सकाळी दहा वाजता 'आर्मी कॉलनी', नेरुळ येथे जमून CFNM च्या कोअर कमिटीचे सभासद श्री. विवेक फडके यांच्या हस्ते भगवान श्री परशुरामाचे पूजन करण्यात आले व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
ह्या कार्यक्रमासाठी केलेल्या स्पोर्ट्स कमिटी मध्ये श्री. शशांक चितळे, श्री. अभि गद्रे व श्री. निशिकांत परांजपे यांनी कोर कमिटीतर्फे तसेच नेक्स्ट जेन ग्रुप मधील कु. पूर्णो रेखी, कु. तन्वी बापट, चि. यशराज नेने, चि. अथर्व ताम्हनकर, चि. अथर्व जाईल यांनी ह्या कार्यक्रमासाठी सर्व नियोजन करण्याचे, खेळाडूंचे मार्गदर्शन, खेळांचे Draws पाडणे तसेच वॉलेंटियरिंगचे काम पाहिले.
CFNM त्याचप्रमाणे सौ. माधवी गानू, सौ. केतकी गोखले श्री. मंदार लिमये, श्री. प्रतीक साठे, श्री. अनिल केळकर, सौ. ललित केळकर, चि. ऋत्विक देवधर , श्री. सचिन पेंडसे, सौ. श्रीया कुंटे यांनीही उत्स्फूर्तपणे वॉलेंटेरिंग चे काम केले.
बॅडमिंटन मध्ये मेन्स कॅटेगरीमध्ये 25 खेळाडूंमध्ये पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येकी दोन मॅचेस खेळल्या गेल्या; तसेच कॅरम व चेस मध्ये सुद्धा सर्वांना कमीत कमी दोन मॅचेस खेळता येतील अशा पद्धतीने ड्रॉची आखणी करण्यात आली होती. त्यानंतर जे खेळाडू स्पर्धा जिंकतील ते पुढे कॉर्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल मध्ये नॉक आऊट पद्धतीने पुढे गेले.
बॅडमिंटन स्पर्धेत 'विमेन्स' कॅटेगरीमध्ये 13 महिलांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये सौ. अनघा भिडे या विजेत्या व कु. पूर्णो रेखी उप विजेत्या ठरल्या.
बॅडमिंटन स्पर्धेत 'मेन्स' कॅटेगरीमध्ये चि. आनंद मराठे हे विजेते तर श्री. शशांक चितळे हे उप विजेते ठरले.
बुद्धिबळ स्पर्धेत श्री. संतोष नेने हे विजेते तर चि. आनंद मराठे हे उप विजेते ठरले.
कॅरम स्पर्धेत श्री.आनंद बापट हे विजेते तर श्री. वामन ओक हे उप विजेते ठरले.
सर्व पार्टिसिपंट्स ना तसेच वॉलेंटियर्सना दुपारचे जेवण व चहा/ कॉफी CFNM तर्फे देण्यात आले. त्याची जबाबदारी 'ए एस ए पी फुड्स' चे श्री. अभि गद्रे व सौ. प्राजक्ता परांजपे यांनी घेतली होती. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी लागणारे बॅनर, स्टिकर, सर्व खेळाडूंना द्यावयाच्या Certificates चे प्रिंटिंग इत्यादी चे काम श्री. निशिकांत परांजपे ह्यांनी पाहिले.
साधारण संध्याकाळी साडेपाच वाजता बक्षीस समारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स कमिटीतर्फे मनोगत व्यक्त करण्यात आले.
त्यामध्ये कॅरम स्पर्धेतील विजेते श्री. आनंद बापट यांनी अतिशय विनम्रपणे ही स्पर्धा उत्तमरीत्या आयोजित करण्यात आल्याचे व सहभागी झाल्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स कमिटीतर्फे श्री. शशांक चितळे, चि. अथर्व ताम्हनकर, चि. यशराज नेने, चि. ऋत्विक देवधर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सर्वांनुमते या स्पर्धा अतिशय उत्तमरीत्या पार पडल्याचे व प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याचे सांगितले. सध्याच्या डिजिटल gadgets च्या जमान्यात अशा प्रत्यक्ष सहभाग असणार्या खेळांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्याचे फायदे लहान थोर सर्वांनाच मिळतात हे निर्विवाद सत्य आहे.
अजूनही जास्तीत जास्त संख्येने लोकांचा सहभाग वाढल्यास स्वागतार्हच आहे, हेही नमूद करण्यात आले.