चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई तर्फे आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांपैकी, सन २०२५ ह्या वर्षाचा पहिला कार्यक्रम म्हणजे 'धुंधुंरमास मास स्नेहभोजन'.
रविवार, दि. १२ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ मध्ये 'तमिळ संगम हॉल', वाशी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
योगायोग असा, की याच तारखेला स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिन असल्याने स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार सर्व समाजापर्यंत विशेषतः पुढील पिढी च्या युवक-युवतींपर्यंत पोहोचावे या उद्देशाने श्री. ललित क्षीरसागर यांचे 'स्वामी विवेकानंदांचे जीवन व त्यांची शिकवण' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सकाळी दहा वाजल्यानंतर प्रथम कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांची नाव नोंदणी करून व त्यांना तिळगुळ, हळदीकुंकू देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये सौ. दर्शना फडके, सौ. प्राजक्ता परांजपे, सौ. प्राची साठे, सौ. सायली नेने व श्रीमती मीराताई लिमये तसेच श्री. मिलिंद गानू यांचा सहभाग होता.
नंतर सौ. माधवी गानू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सौ. सानिका ताम्हनकर ह्यांनी कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
भगवान परशुराम आणि स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला हार घालून पूजन करण्यात आले.
सौ. सानिका ताम्हनकर यांनी चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई तर्फे सन २०२५ मध्ये आयोजित होणार्या कार्यक्रमांच्या कॅलेंडरचे उद्घाटन केले व सविस्तर माहिती दिली.
श्री. कौस्तुभ गोखले यांनी प्रमुख वक्ते श्री. ललित क्षीरसागर यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे व्याख्याते श्री. ललित क्षीरसागर यांनी अतिशय अभ्यासपूर्वक व समर्पक असे माहितीपूर्ण व्याख्यान रंजकतेने सादर केले. स्वामी विवेकानंद ह्यांच्या काही दुर्मिळ व बऱ्याच लोकांना माहीत नसणाऱ्या घटना नमूद केल्या. त्याचप्रमाणे त्यांचे विचार, त्यांच्या युवकांकडून असणाऱ्या अपेक्षा तसेच त्यांनी केलेले भरीव कार्य अतिशय सोप्या व प्रवाही शब्दात पण परिणामकारक पद्धतीने मांडले. श्री. ललित क्षीरसागर ह्यांचा आपल्या समूहातील ज्येष्ठ सभासद श्री. विलास ताम्हणकर यांच्यातर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. संतोष नेने यांनी गेल्या वर्षातील म्हणजे सन २०२४ मधील चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई ने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा समर्पकपणे आढावा घेतला व समूहाकडून या पुढील काळात असणार्या अपेक्षा व्यक्त केल्या.
श्री. केतकर ह्यांनी समूहातर्फे प्रमुख पाहुणे, सर्व उपस्थित मंडळी तसेच हा कार्यक्रम नेटकेपणाने आयोजित व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे यथोचितपणे आभार प्रदर्शन केले.
त्यानंतर स्नेहभोजनामध्ये सर्व उपस्थितांनी (सौजन्य : 'केतकर केटरर्स', दादर) सुग्रास अशा भोगीच्या जेवणाचा आनंद घेऊन कार्यक्रम संपन्न केला.
ह्या धुंधुंरमास स्नेहभोजन', कार्यक्रमाच्या आखणी व आयोजन करण्यात सर्व कोर कमिटीच्या सभासदांबरोबरच सौ. स्वाती फडके, श्री. विवेक फडके, श्री. सुरेंद्र केतकर, श्री. आमोद ताम्हनकर ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.