रूप तुझे काय वर्णू । जैसा शोभतो भानू।।
बैसली सिंहासनी अंबा । भक्ति कामधेनू।।
इच्छिले फळ देसी । तुज ध्याति ग जन।।
जयदेवी आदिरूपे । परशुरामाचे माते।।
आरती ओवाळेन महंमाय रेणुके.... जयदेवी....॥१॥
नऊ दिवस नवरात्र। माझ्या अंबेचे व्रत।।
याचक जन येती । महोत्सव थोर होती।।
रेणुका नाम तुझे । तुज ध्याति ग जन।।
जयदेवी आदिरूपे । परशुरामाचे माते।।
आरती ओवाळेन महंमाय रेणुके.... जयदेवी....॥२॥
मातापुरादी मूळ । तुज तुळजापूर।।
नांदती सप्तश्रृंग । दैत्य धाक हा थोर।।
पाठक गंगाधर । विनवितो जोडोनी कर।।
जयदेवी आदिरूपे । परशुरामाचे माते।।
आरती ओवाळेन महंमाय रेणुके.... जयदेवी....॥३॥
**********************************************
अहो दक्षिण देशामध्ये एक म्या तुळजापूर देखिले हो
तुळजापूर देखिले
राज्य करी तुळजा, राज्य करी तुळजा,
साधुसंताचे माहेर हो
दर्शनाला येती ब्रह्मा विष्णु महेश्वर हो, जयजय अष्टभुजे....॥१॥
तुकाई दैत्यावर, तुकाई दैत्यावर
सोडी महंकाळ दरबार हो
जयजय अष्टभुजे, जयजय अष्टभुजे अष्ट आयुधे तुज शोभती हो
काय वर्णू रूप, काय वर्णू रूप तुझे
सहज गुण शोभती हो, जयजय अष्टभुजे....॥२॥
व्याघ्रावर बैसोनी महिषासुराशी युद्ध करी
नाटक महिषासुर, नाटक महिषासुर
संगे परिच्या माया धरी हो पळत पळत गेली सप्तश्रृंग गडावरी हो
हंकरीला त्रिशूळ, हंकरीला त्रिशूळ हो
मारीला तयाच्या उदरी हे, जय जय अष्टभुजे ॥३॥
मारीला महिषासूर, तुकाई झाली यशवंत हो
तेहतीस कोटी देव, तेहतीस कोटी देव
चरणालगती समस्तक हो
त्रिंबक शंभो म्हणे, अंबा झाली यशवंत हो जयजय अष्टभुजे ॥४॥
**********************************************
जयदेव जयदेव जयजय श्रीमूर्ति
हरहर गणपती भास्कर अंबा करु आरती....जयदेव जयदेव ।।
मेघ: श्यामा सुंदर पीतांबर कासे
शंख गदाधर आयुधे चतुर्भुज विलसे
श्रीवत्स मणि कौस्तुभ कंठी शोभतसे
सर्वांतर यामित्वे सर्वा कंठी वसतसे....जयदेव जयदेव ॥१॥
पंचवदन शशीभूषण शिवकर्पूर गौर
दशहस्ते आयुधे भस्म जटाधर
एका बाणे दग्ध केले ते त्रिपूर
ऐसा शंभो गाती नरवर सुरवर....जयदेव जयदेव ॥२॥
गौरीशंकर याचे जे क्रीडा सदन
शेंदूर भाळी भव्य शोभे गजवदन
रक्तचंदन अंगी रक्तांबर वर्ण
सर्वा भरणी ती सुशोभित श्री विघ्नहरण....जयदेव जयदेव ॥३॥
तमनाशन सुखकर्ता नेत्र ब्रह्महरणा
संधीपासून विप्र गाती तवचरणा
विद्युत द्युति मणिमय देती तुझिया आभरणा
सर्वा भरणी ती योगे तुझिया भवतरणा....जयदेव जयदेव ॥४॥
आद्य: शक्ती त्रिगुणात्मा श्री परमेश्र्वरी
पंचमहाभूतांचा मंडप विस्तारी
चतुर्भुज प्रजा जंगम स्थावरी
खेळाखेळून ऐशा निजदासा तरी....जयदेव जयदेव ॥५॥
टीप : साधारणपणे 5 फळे / पेढे वगैरेचा नवरात्रीच्या अष्टमीला नैवेद्य म्हणून दाखवतात. तथापि लाल डाळिंबाचे दाणे सुद्धा समाविष्ट करण्याची प्रथा आहे.