Chitpavan Navi Mumbai Samuha Picnic on 10th December 2023 at Nisarga Farms, PEN

"आजची पिकनिक अविस्मरणीय झाली. अर्थातच पिकनिक इतकी सुंदर होण्यासाठी सर्व कमिटी मेंबर ani तरुण मुलानी खूपच मेहेनत घेतली ani तीही अतिशय हसतमुखाने, प्रेमाने. आम्हा सिनिअर लोकाना खूप छान सांभाळले. सगळे खेळ नवीन होते, खेळायला मजाही खूप आली. सर्वच नियोजन शिस्तबद्ध होते. सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार अणि धन्यवाद." - Dr Tamhankar

"आजच्या अविस्मरणीय पिकनिक साठी खूप खूप धन्यवाद🙏... तशी आमची तुम्हा सगळयांना भेटायची ही पहिलीच वेळ होती..... खूप छान वाटलं भेटून अगदी मनापासून .... काही ओळखी झाल्या काही राहिल्या... त्या होतच राहतील... भेटू असेच परत परत..... पिकनिक च नियोजन अतिशय उत्तम होत.... त्या साठी तुम्ही सगळ्यांनी घेतलेल्या मेहनतीच खूप खूप कौतुक...परत एकदा खूप धन्यवाद for memorable day 🙏.... पुढील प्रत्येक कार्यक्रमाला भेटू 🙏" - Smt. Bageshri Joshi

"आजचा पिकनिक अनुभव खूप सुंदर.नव्या ओळखी व जुने स्नेहसंबंध परत जोडले गेले. दिवस आनंदात गेला. जेवण, नाश्ता चहा व खेळ सर्व आयोजित कार्यक्रम योग्य वेळेत झाले. आयोजकांनी घेतलेली मेहनत मोलाची. सगळ्यांचे आभार." - Smt Medha Patwardhan

"खूप छान झाली पिकनिक. पूर्ण दिवस.... Breakfast पासून संध्याकाळी चहा - वडे खाऊन निघेपर्यंत काही ना काही ॲक्टिविटी होती. छान गप्पाही झाल्या. सर्व वयोगटासाठी गेम्सच आयोजन असल्याने सर्व ग्रुप एकत्र राहिला. आयोजकांचे आभार. मजा आली. धन्यवाद" 🙏

आमची पहिली वहिली चित्पावन सहल, होती फारच खास 👌, काय आणि किती करू वर्णन असा प्रश्न पडलाय मनास🙏🏼, पोटभर नाश्ता आणि सुग्रास जेवण होत विनासायास😋, मस्त मस्त नियोजनबद्ध खेळांमध्ये मग जिंकण्याचा केला सर्वांनी प्रयास 🏆🥇🏅, सरतेशेवटी वडापाव आणि चहापानानंतर संपला सहलीचा प्रवास🚌, रूंजी घालत आठवणी जमल्या फारच झकास 😇धन्यवाद 🙏🏼 आपणा सर्वांना, असाच लाभावा कायम आपला सर्वांचा सहवास 🌹" - Smt Dhanashree Mudliyar

"आजच्या picnic साठी सर्व आयोजकांनी खूप मेहनत घेतली सर्व सुविधा, नियोजन, जेवण, नाश्ता, योग्य वेळी सर्वांना मिळेल याची काळजी घेतली, या साठी सर्वांना खूप धन्यवाद. 💐🙏🏼👍🏼👌" - Smt. Sumedha Jog

"आजची पिकनिक खूप मस्त झाली...👌👌सर्व volunteers चे खूप खूप कौतुक आणि आभार.... आले नाहीत त्यांनी खूप मिस केली मज्जा...पुढच्या वेळी नक्की जमवा...नक्की आवडेल तुम्हाला..." - Shri Shashank Chitale