मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी चित्तपावन फाउंडेशन, नवी मुंबई च्या वतीने, रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी, आषाढी एकादशीच्या आधी, वारीचे आयोजन करण्यात आले होते.
मागीलवर्षी प्रमाणेच याही वर्षी तितक्याच उत्स्फुर्तपणे आणि उत्साहाने लोक वारीत सामील झाले होते.
पुरुषांसाठी, पांढरा कुर्ता- पायजमा, टोपी
बायकांसाठी- सलवार कुर्ता किंवा साडी अशी वेशभूषा ठरवली होती.
सकाळी ठीक ७ वाजता सर्वांनी "ज्वेल ऑफ नवी मुंबई" नेरुळ, च्या मेन गेट वर जमायचे होते (जिथे फ्लेमिंगोचा मोठा पुतळा उभारलेला आहे)
नंतर तिथून डावीकडे चालायला सुरवात करून, आगरी कोळी भवन, वझिरांनी जिमखान्या वरून परत U टूर्न मारून, आलेल्याच रस्त्याने, विठ्ठल रखुमाई मंदिरात वारकरी पोचले, (हा मार्ग साधारण २.५ किलोमीटर लांबीचा आहे.)
मंदिरात पोचल्यावर तिथे विठुरायाच्या नामाचा जयघोष करून आरती करण्यात आली. सर्वांनी श्री विठ्ठल-रखूमाईचे दर्शन घेतले.
मागच्या वर्षी मंदिरातून आपल्या गाडीपर्यंत पोचण्यासाठी रिक्षा वगैरे उपलब्ध न झाल्यामुळे बऱ्याच जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता, हा त्रास टाळण्यासाठी, यावर्षी ज्वेल वरून निघून परत ज्वेल च्या गेट वर असा मार्ग निवडण्यात आला होता.
मागीलवर्षी अनेक जणांनी साबुदाणा खिचडी किंवा चहा याचा खर्च उचलायची तयारी दर्शवली होती त्यामुळे या वर्षी या खर्चासाठी CFNM कडून ऐच्छीक देणगी घ्यायचे ठरवले होते. ज्यांना कोणाला देणगी द्यायची इच्छा होती त्यांनी ती रोख रकमेच्या स्वरूपात सौ. माधवी गानू किंवा श्री. मिलिंद गानू यांच्याकडे जमा केली.
तरुण पिढीलाही या वारीमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले होते जेणेकरून त्यांचाही सहभाग वाढेल.
वारी मध्ये अंदाजे तीनशे लोक सहभागी झाले होते.
ह्यावर्षी आपल्या चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई मधील चि. श्रीश पेंडसे ह्या बाल कलाकाराने अतिशय छान पद्धतीने, श्री मकरंद बुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली, कीर्तन सादर केले. त्याला पेटीवर श्री. विशाल राजगुरु व तबल्यावर श्री. ओंकार काळे ह्यांनी समर्पक साथसंगत केली.
ह्यावर्षी च्या वारीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वारी मध्ये फक्त चित्पावन किंवा ब्राह्मण समाज अशा मर्यादा न ठेवता समाजातील सर्वांना सामावून घेण्यात आले होते. ह्यातून चित्पावन परिवाराचे समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी असलेला बंधुभाव तसेच आपल्या पूर्वजांच्या चांगल्या प्रथा/ चालीरीती सांभाळणे, मराठी भाषिक किंवा त्याहीपलीकडे जाऊन सर्वसमावेशक पद्धतीने एकोपा राखण्याचे उद्दिष्ट अधोरेखित होते.
आयोजनाच्या दृष्टीने प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी जरी हे शक्य नसले तरी जेव्हा जेव्हा शक्य असेल तसेच सार्वजनिक हिताच्या दृष्टीने गरजेचे असेल तेव्हा चित्पावन परिवार त्याकडे बंधुभाव व आपुलकीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो.
असे धार्मिक कार्यक्रम एकत्र येऊन साजरे केल्यामुळे समाजामध्ये एकात्मता आणि निकोप मानसिकतेचा विकास व्हावा, यासाठी गरजेचे असतात.
तसेच, वारी यशस्वी होण्यामागे सौ. माधवी व श्री. मिलिंद गानू, सौ. सानिका ताम्हनकर व श्री. आमोद ताम्हनकर, सौ. सायली व श्री. संतोष नेने, सौ. प्राजक्ता व श्री. निशिकांत परांजपे, श्री. अभि गद्रे आणि श्री. प्रसन्न जोग यांनी विशेष परिश्रम घेतले.